Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

बी.एससी – एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहन

पात्र उमेदवारांकडून ३१ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, नोएडा, आयएचएम यांच्या वतीने एनसीएचएमसीटीशी संलग्न असलेल्या आयएचएम सोलापूर येथे बी.एससी-एचएचए (हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ३१ मे २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ – सविस्तर बातमी 

उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून कोणत्याही विद्याशाखेत १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. इयत्ता बारावीत इंग्रजी विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. प्रवेशाकरिता वयाची अट नाही. प्रवेशासाठी सरकारी नियमांनुसार आरक्षण राहील. हा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त असून विद्यापीठाकडून अंतिम पदवी प्रदान करण्यात येईल.

इच्छुक उमेदवाराने दाखल्यांच्या प्रती जोडून संस्थेत अर्ज करावा. अर्ज पोस्टाने किंवा वर नमूद केल्याप्रमाणे ईमेलद्वारे देखील पाठवता येतील. प्रवेश अर्ज आणि इतर तपशील https://ssmihm.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरीता मृणाल एम ९७६७२५७०२१ यांच्याशी संपर्क साधावा.

एनसीएचएमसीटीद्वारे घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जाईल. याबाबतच्या तारखा पात्र अर्जदारांना कळविण्यात येतील. लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उप संचालक शमा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×