दोन पीडित महिलांची सुटका ; येवलेवाडी पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – Spa Center Raid Pune : स्पा मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा येवलेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. साळवे गार्डनशेजारील अल्टिमेट बिझनेस सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एका महिला आरोपीला अटक केली आहे.
बाणेर परिसरात लूटमार करणारे गजाआड – सविस्तर बातमी
कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दीपक कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक आकाश विटे यांचे पथक गस्तीवर असताना पोलिस अंमलदार गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांना स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. (Spa Center Raid Pune) माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष पडताळणी केली. माहितीची खात्री पटताच संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या वेळी दोन पीडित महिलांची सुटका करून महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 20 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आल्यानंतर याप्रकरणी येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक दीपक कराडे, अमंलदार महेश बेदुगडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, अमित बधे, उमेश पाटील, सुषमा हिंगमिरे, विजय खेंगरे, अनिल बनकर, रुपेश पाटील, सोनाली कांबळे आणि स्नेहा काचरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.





















