धनकवडीजवळ शंकर महाराज मंदिरासमोरील घटना
marathinews24.com
पुणे – Pune Drunk Driving Accident : भरधाव मद्यपी टेम्पो चालकाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास धनकवडीजवळ शंकर महाराज मंदिरासमोर झाला. टेम्पोचालक अपघातानंतर पसार होण्याच्या प्रयत्नात असताना त्याला नागरिकांनी पकडून ठेवले. यासंदंर्भात पोलिसांनी चालकाचे मद्य चाचणी केली आहे.मयुर मनिष होनकळसे (वय २६, रा. बालाजीनगर, मुळ. सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. टेम्पो चालक विवेकानंद बनगट भगत (वय २३, रा. चाकण) याला अटक केली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत मयुरचे वडिल मनिष होनकळसे यांनी तक्रार दिली आहे.
वाघोलीत ५ दिवसांच्या नवजात बालिकेला कचऱ्यात फेकले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर होनकळसे बालाजीनगर भागात राहण्यास होता. तो हॉटेलमध्ये हेड शेफ म्हणून नोकरी करत होता. दररोज दुपारी चारला तो हॉटेलमध्ये काम करण्यासाठी जात होता. दरम्यान, सोमवारी रात्रीही तो दोनच्या सुमारास घरी निघाला होता. मयुर नेहमी, हॉटेलमधून घरी जात असताना शंकर महाराज मंदिरासमोर उभा राहून बाहेरून पाया पडून पुढे जात असत. तो दररोज थांबून पाया पडत असल्याने फुटपाथवर असलेल्या काही भिक्षेकरी त्याला ओळखत होते. सोमवारी रात्री तो फुटपाथवरून पाया पडून पुन्हा तो परत घरी जाण्यास निघाला.
रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीवर बसला असता पाठिमागून भरधाव आलेल्या टेम्पोने त्याला जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर टेम्पो चालक पसार होण्याच्या प्रयत्नात होता. (Pune Drunk Driving Accident) परंतु येथील सुरक्षा रक्षक तसेच भिक्षेकऱ्यांनी त्याला अडविले. त्याला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, टेम्पो चालक विवेकानंद हा दारूच्या नशेत होता. त्याने दारू प्यायली होती, अशी माहिती मयुरच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होनकळसे कुटूंबियांनी केली आहे. अधिक तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.




















