Breking News
Chakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शनPune Teacher Constituency Election : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानRana Suryawanshi Attack Case : दोन लाखांची सुपारी, हल्लेखोरासह दोघे अटकेतPune Drunk Driving Accident : मद्यपी टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूWagholi Newborn Baby Case : वाघोलीत ५ दिवसांच्या नवजात बालिकेला कचऱ्यात फेकलेPune News : पुण्यात ९ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्‍ती !Spa Center Raid Pune : स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; कोंढव्यात पोलिसांचा छापाDr. Neelam Gorhe : दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या-डॉ. नीलम गोऱ्हेPune Drought News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण

Pune Teacher Constituency Election : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Pune Teacher Constituency Election पुणे जिल्ह्यात पदवीधरांसाठी १६०, तर शिक्षकांसाठी ७२ मतदान केंद्रे; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

पुणे जिल्ह्यात पदवीधरांसाठी १६०, तर शिक्षकांसाठी ७२ मतदान केंद्रे; २७ ऑक्टोबरला मतमोजणी; मतदान साहित्य वितरण, स्वीकृती केंद्रे व स्ट्राँगरूमचे नियोजन निश्चित

marathinews24.com

पुणे – Pune Teacher Constituency Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी १६०, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७२ अशी एकूण २३२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या दोन्ही मतदारसंघांत पदवीधर मतदारसंघासाठी ४७, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे.

दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या-डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

पदवीधरांसाठी १६०, शिक्षकांसाठी ७२ मतदान केंद्रे

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पुणे जिल्ह्यात १६० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसंघात ४७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात ७२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या मतदारसंघात ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य वितरण आणि केंद्रनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

पदवीधर मतदारसंघात ८८ हजार २०२, तर शिक्षक मतदारसंघात १६ हजार ८८२ मतदार

पुणे जिल्ह्यात पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या १६० मतदान केंद्रांवर ८८ हजार २०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या ७२ मतदान केंद्रांवर १६ हजार ८८२ मतदार मतदान करणार आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून १ लाख ५ हजार ८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नऊ तालुके व पुणे शहरासाठी केंद्रनिहाय नियोजन

निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहरासह पुरंदर, हवेली, मावळ-मुळशी, भोर-वेल्हा, दौंड, जुन्नर, खेड आणि बारामती-इंदापूर या तालुका क्षेत्रांसाठी मतदान साहित्य वितरण केंद्र (डिस्पॅच सेंटर), मतदान साहित्य स्वीकृती केंद्र (रिसिव्हिंग सेंटर) आणि स्ट्राँगरूमची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
पुरंदरसाठी नवीन प्रशासकीय इमारत, पारगाव रोड; हवेलीसाठी सिंहगड कॉलेज, आंबेगाव; पुणे शहरासाठी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट; मावळ-मुळशीसाठी संबंधित तहसील कार्यालये; भोर-वेल्ह्यासाठी तहसील कार्यालय, भोर येथील पुरवठा शाखा; दौंडसाठी तहसील कार्यालय, दौंड; जुन्नरसाठी तहसील कार्यालय, जुन्नर; खेडसाठी तहसील कार्यालय तर बारामती-इंदापूरसाठी अभियांत्रिकी भवन, बारामती येथे केंद्रनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे.

(Pune Teacher Constituency Election) मतदानानंतर साहित्य सुरक्षितपणे स्वीकारणे, त्याची वाहतूक आणि साठवणूक यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील साहित्याची सुरक्षित हाताळणी आणि केंद्रांमधील समन्वयावर प्रशासनाने भर दिला आहे.

२७ ऑक्टोबरला मतमोजणी

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
मतदारांनी निर्धारित वेळेत संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×