दुचाकीस्वाराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. भैय्या नवनाथ जाधव (वय २२, रा. शेवाळवाडी, पुणे-साेलापूर रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. दुचाकीस्वार प्रीतम कानिफनाथ अवताडे (वय २७, रा. तुकाई दर्शन सोसायटी, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जाधव याचा चुलतभाऊ दत्ता नारायण जाधव (वय ४२, रा. शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैय्या जाधव बुधवारी (२१ ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील १५ नंबर चौकातून निघाला होता. त्या वेळी लक्ष्मी काॅलनी परिसरात भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या जाधव याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जाधव याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश निकम तपास करत आहेत.


















