बारामतीत सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद; ८१९ लाभार्थ्यांना विविध उपक्रमांचा लाभ
marathinews24.com
बारामती – महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्या वतीने दि. १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध आरोग्यविषयक जनजागृतीपर व सामाजिक उपक्रमांचे अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावा – सविस्तर बातमी
महिलांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी, नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा एकूण ४८५ महिलांनी लाभ घेतला.
अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानाची प्रक्रिया, सामाजिक गैरसमज आणि अवयवदानामुळे रुग्णांना मिळणारे नवजीवन याबाबत जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान, रांगोळी प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा आणि ‘Why Be an Organ Donor?’ या विषयावरील पथनाट्य आयोजित करण्यात आले. विविध उपक्रमांतून अवयवदानाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या अभियानाचा एकूण २४० लाभार्थ्यांना लाभ झाला. भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. भालेराव व सहयोगी प्राध्यापक डॉ. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय सहाय्य व शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रासंबंधी आवश्यक कार्यवाही करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा एकूण ९४ दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमाप व सहयोगी प्राध्यापक डॉ. पांढरे यांच्या सहकार्याने शिबिराचे कामकाज पार पाडण्यात आले.
या उपक्रमांद्वारे आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे, गरजू व्यक्तींपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे यावर भर देण्यात आला. नोडल अधिकारी डॉ. राजेश लकडे यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजसेवेच्या मूल्यांना प्रोत्साहन मिळाले.



















