समर्थ आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – रास्ता पेठेतील पद्मजी पार्क सोसायटी, तसेच लोणी काळभोर भागातील म्हाताेबाची आळंदी परिसरात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी समर्थ आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. रास्ता पेठेतील पद्मजी पार्कमधील सीतामहल सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २८ हजार रुपयांचे दागिने लांबविले. याबाबत महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस फौजदार संतोष पागार तपास करत आहेत.
सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपार – सविस्तर बातमी
लोणी काळभोरमधील म्हातोबाची आळंदी परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील पावणेतीन लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म्हातोबाची आळंदी परिसरात शितळादेवीनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडण्यात आले. चोरट्यांनी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकााच्या पत्नीचे कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.






















