Breking News
Rapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहनMaharashtra Revenue Department : महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानPune Crime Branch Arrest : रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यातSwargate Bus Theft Case : एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुटPune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपयेEach Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्टSadashiv Peth ATM Theft : सदाशिव पेठेत एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्नPune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदी

Each Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट

Each Woman Champion Maharashtra

गर्जे मराठी ग्लोबलचा ‘एक महिला, एक चॅम्पियन’ उपक्रम

marathinews24.com

पुणे – Each Woman Champion Maharashtra : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देत लघु व सूक्ष्म महिला उद्योजिकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने गर्जे मराठी ग्लोबलतर्फे ‘इच वुमन चॅम्पियन’ (Each Woman Champion – EWC) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि ३५० तालुके व तहसीलमधील महिला उद्योजिकांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना आधुनिक व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आणि राज्याच्या आर्थिक विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.। उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ शनिवार, ३१ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता पुण्यातील सीओईपीच्या भाऊ इन्स्टिट्यूटच्या सभागृहात होणार आहे. महिला उद्योजिकांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांसाठी दिवसभराचे प्रशिक्षण शिबिर (ट्यूटर-ट्रेनर बूटकॅम्प) आयोजित करण्यात आले आहे.

दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणार – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्लुकोन इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि भाऊ इन्स्टिट्यूटचे सहसंस्थापक संजय इनामदार, तसेच गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Each Woman Champion Maharashtra) इच वुमन चॅम्पियन’ उपक्रमांतर्गत पुढील ५ पाच वर्षांत एकूण ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरवर्षी सात हजार महिला उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

गर्जे मराठी ग्लोबलशी संबंधित विविध विषयांतील तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि गुंतवणूकदार स्वेच्छेने या उपक्रमात योगदान देणार आहेत. सहभागी महिलांना दर आठवड्याला दोन तास, अशा प्रकारे १२ आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून व्यावसायिक ज्ञान, कौशल्ये आणि व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी स्थानिक पातळीवर समन्वयक आणि निरीक्षकांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात २५ तालुक्यांतील ५०० महिला उद्योजिका सहभागी होणार

या उपक्रमाचा प्रायोगिक टप्पा डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २५ तालुक्यांमधील ५०० महिला उद्योजिकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून महिलांना व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने चालविण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढविण्याचा संकल्प

महिला उद्योजकांना सक्षम करून त्यांना राज्याच्या आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या उपक्रमाचा व्यापक दृष्टिकोन आहे. तळागाळातील महिलांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या उद्दिष्टात त्यांचा सहभाग वाढविण्याचा गर्जे मराठी ग्लोबलचा प्रयत्न आहे.

महिलांना केवळ व्यवसाय सुरू करण्यासाठीच नव्हे, तर तो यशस्वीपणे विकसित करून व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ही या उपक्रमाची प्रमुख दिशा आहे. असा संकल्प गर्जे मराठी चे संस्थापक आंनद गानू यांनी केला आहे .तर या उपक्रमात मोठ्या संख्येने महिलांना सहभागी होण्याचे आवाहन माधव दबके यांनी केले आहे .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×