Breking News
Rapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहनMaharashtra Revenue Department : महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानPune Crime Branch Arrest : रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यातSwargate Bus Theft Case : एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुटPune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपयेEach Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्टSadashiv Peth ATM Theft : सदाशिव पेठेत एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्नPune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदी

Swargate Bus Theft Case : एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुट

Swargate Bus Theft Case

परराज्यातील सराईताला अटक, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – Swargate Bus Theft Case : एसटी प्रवासादरम्यान शेजारील प्रवाशांना बोलून विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना गुंगीकारक गोळ्या खायला देउन लुट करणार्‍या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीची सोन्याची लगड, गुंगीच्या गोळ्यांची दोन पाकिटे असा ऐवज जप्त केला आहे. बाबू भुरेखान (वय ६३ रा. मंदसौर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपये – सविस्तर बातमी 

बोरवली ते स्वारगेट असा शिवशाही बसने प्रवास करणार्‍या व्यक्तीला आरोपीने संजय अगरवाल असे खोटे नाव सांगितले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर त्याने प्रवाशाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याने संबंधिताला गुंगीकारक गोळी खायला देउन, तक्रारदाराच्या वडिलांच्या हातातील १० ग्रॅम सोन्याची अंगठी चोरुन नेली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Swargate Bus Theft Case) त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी आरोपीचा माग काढण्याचे आदेश तपास पथकाला दिले होते. शिवशाही बसमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी तपासाला गती दिली.

गुन्ह्यातील आरोपी हा मध्यप्रदेशातील असून, तो सराईत बाबू भुरेखान असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो महाकाल उज्जैन परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी बाबूला उज्जैनमधून ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी गजानन पवार, वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, पोलीस निरीक्षक प्रदीप सिंगसि सोदे, एपीआय स्वप्नील शेळके, उपनिरीक्षक बाळू शिरसट, प्रदीप शिंदे, किरण रघतवान, नितीन क्षीरसागर, रमेश चव्हाण, अक्षय भोगे, युवराज राठोड, सोमनाथ बटुळे, किरण ढापकर, रोहित पवार यांनी केली.

अशी करीत होता प्रवाशांची लुट

आरोपी बाबू याच्याविरूद्ध यापुर्वी नागपूर, द्वारका ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अलिशान बसमधून प्रवास करीत सोने अंगावर बाळगणार्‍या प्रवाशाच्या शेजारी जाउन तो बसत होता. त्यानंतर काही वेळाने तो प्रवाशासोबत बोलण्यास सुरुवात करत होता. विश्वास संपादन केल्यानंतर अलप्रॅक्स पॉईंट फाईव्ह नावाची गोळी खाण्याच्या पदार्थात मिसळून सहप्रवाशाला खायला देत होता. संबंधित प्रवासी अर्ध झोपी गेल्यानंतर त्याच्याकडील सोन्यासह रोकड घेऊन आरोपी बाबू पसार होत होता. त्याच्याकडून संबंधित १५ गोळ्यांची दोन पाकिटे जप्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×