Breking News
Fodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवार

Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूक

पोलीस भरतीनिमित्त सहकारनगर भागात वाहतूक बदल

आव्हाळवाडीकडून वाघोली गावठाणाकडे येणाऱ्या वाहनांना बंदी

marathinews24.com

पुणे – वाघोली परिसरात होणारी कोंडी विचारात घेऊन वाघोलीतील लोहगाव चौकातून अहिल्यानगर रस्त्याला जोडणारा रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहेत. या रस्त्याच्या वापर करणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

‘पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात वाहतूक कोंडी होती. नगर रस्त्यावरील वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंद दरम्यान वाहतूक संथगतीने सुरू असते. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा केसनंदपर्यंत लागतात. वाघोली गावठातील रस्ता दहा ते पंधरा फूट रुंद आहे. या रस्त्यावरील दुतर्फा वाहतुकीमुळे सातत्याने या भागात कोंडी होते. त्यामुळे वाघोली गावठाण चौकाकडून नगर रस्त्याकडे जाणारा मार्ग एकेरी करणे गरजेचे आहे’, अशी माहिती पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.

भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे

वाघोली-लोहगाव गावठाण रस्त्याने पुणे-नगर रस्त्याला जोडणारा रस्ता एकेरी करण्यात येणार आहे. आव्हाळवाडीकडून वाघोली-लोहगाव गावठाणाकडे येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आव्हाळवाडी, तसेच नगर रस्त्याने लोहगावकडे जाणाऱ्या वाहनांनी वाघेश्वर चौकातून उजवीकडे वळून लोहगाव चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×