Breking News
Akshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

Jat Taluka Drought : जत तालुक्यात दुष्काळाचे भयाण वास्तव; अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

Jat Taluka Drought

विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी खालवली; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर

marathinews24.com

सांगली – सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील विहिरी, (Jat Taluka Drought) कूपनलिका आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी झाल्याने तालुक्यातील नागरिकांसह पशुपालकांची चिंता वाढत चालली आहे. सध्या तालुक्यात ४९ गावांना ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवाना – सविस्तर बातमी 

जत तालुक्यात अनेक गावात टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. दुसरीकडे, तालुक्यात चाऱ्याचे दर वाढल्याने जनावरांचे संगोपन करणे पशुपालकांसाठी अवघड होत आहे. शासनाने तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करावेत, किवा त्वरित चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.

पाउस नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प; शेतकरी, मजुरांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न

पाउस नसल्यामुळे शेतीची कामे झालेली नाहीत. परिणामी शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला पुरेसे काम मिळत नसल्याचे चित्र आहे. उपलब्ध पाण्याचा उपसा करण्यासाठी देखील आवश्यक दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पाणीटंचाईचा परिणाम शेतीबरोबरच पशुपालन आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावरही होत चालला आहे.

जत पूर्व भागात पशुपालकांचे अतोनात हाल

Jat Taluka Drought जत तालुक्याच्या पूर्व भागात हिरव्या चाऱ्याची उपलब्धत नसल्यामुळे मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा आणि पाणी मिळविण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. चारा खरेदीचा वाढता खर्च आणि पाण्याची कमतरता यामुळे पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

पाणीटंचाई आणि चारा संकटाची तीव्रता लक्षात घेता टँकरचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, तसेच चारा डेपो सुरू करण्याबाबत प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिक आणि पशुपालकांकडून व्यक्त होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×