Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली

Pune Constitution Day Festival

संविधान दिन महोत्सवातील परिसंवादात विचारवंतांचे मत; डॉ. बाबा आढाव आणि सुरेंद्रनाथ टिपणीस यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

marathinews24.com

पुणे – Pune Constitution Day Festival : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. महात्मा फुले यांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा पुढे नेत भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये अधोरेखित केली. संविधानाच्या वैचारिक पायाभरणीत महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत विचारवंतांनी व्यक्त केले.

विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणार – सविस्तर बातमी 

संविधान दिन, महात्मा ज्योतिराव फुले जन्मद्विशताब्दी आणि महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सम्यक साहित्य संमेलन यांच्या वतीने आयोजित महोत्सवात ‘महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य : भारतीय संविधानाच्या समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचे प्रेरक स्त्रोत’ या विषयावर परिसंवाद झाला. निवृत्त न्यायमूर्ती यशवंत चावरे, विचारवंत मिलिंद टिपणीस आणि ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख विजय खरे, महोत्सवाचे प्रमुख तथा उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, समितीचे सचिव दीपक मस्के आदी उपस्थित होते.

निवृत्त न्यायमूर्ती यशवंत चावरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला मुक्तीचा संदेश देत अन्यायाविरोधात संघर्ष केला. त्यामुळेच आज समाजाला चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. बहुजन समाजाने राजकीय सत्तेत सहभागी होऊन सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारणात सक्रिय होण्याची गरज आहे.

मिलिंद टिपणीस म्हणाले, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा लढा नव्हता, तर भारतीय इतिहासातील सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होती. या सत्याग्रहामुळे जातीय विषमतेविरोधात समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. राजकीय लोकशाही बळकट करण्यासाठी सांस्कृतिक लोकशाहीही मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना संविधानाचे शिक्षण दिले पाहिजे.

ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना तयार केली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती व्हावी, हा महात्मा फुले यांच्या कार्यामागील मूलभूत विचार होता.

प्रास्ताविक करताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूल्ये बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक शाळेत संविधान दिन साजरा करणे आवश्यक आहे.

डॉ. बाबा आढाव, सुरेंद्रनाथ टिपणीस यांना जीवनगौरव पुरस्कार

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, हमाल पंचायत व रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव आणि महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी असलेले सुरेंद्रनाथ टिपणीस यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. बाबा आढाव यांच्या वतीने त्यांच्या पत्नी शीला आढाव, तर सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या वतीने त्यांचे नातू मिलिंद टिपणीस यांनी पुरस्कार स्वीकारला. महात्मा फुले पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख 51 हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी केले. डॉ. निशा भंडारे, किरण सुरवसे यांनी मानपत्र वाचन  केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×