Breking News
पीएमपीएलसह एसटी प्रवासात महिलांचे दागिने चोरीलापुण्यात धुमस्टाईल दागिने हिसकावण्याचा सपाटा कायममुख्याध्यापक पदासाठी अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहनपुण्यात दोघा सराईतांची कारागृहात रवानगीहवाई दलाच्या जवानाच्या वेशात करत होता वावरइनोव्हा कार चालकाने मुलाला चिरडलेबेशिस्त ट्रक चालकामुळे क्लासला निघालेल्या ११ वर्षीय मुलाचा मृत्यूदृढ, समाधानी वैवाहिक आयुष्याची सुरुवात पारदर्शक संवादातून- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजनट्रेंडीग स्टॉकचे आमिष पडले १५ लाखांना; सायबर चोरट्यांकडून तरूणाला गंडाबिबवेवाडीत जुन्या वादातून तरूणावर वार, अल्पवयीन टोळके ताब्यात

इनोव्हा कार चालकाने मुलाला चिरडले

इनोव्हा कार चालकाने मुलाला चिरडले

कोंढव्यातील भोलेनाथ चौकात भीषण अपघात, चालक अटकेत

marathinews24.com

पुणे – भरधाव इनोव्हा चालकाने दिलेल्या धडकेत १३ वर्षीय मुलगा ठार झाला आहे. ही घटना रविवारी दि. १८ संध्याकाळी सहाच्या सुमारास कोंढवा बुद्रुक गावठाणमधील भोलेनाथ चौकात घडली आहे. इनोव्हा कारने (क्र. MH 31 CA 5888) दिलेल्या जोरदार धडकेत निवृत्ती बाजीराव किसवे (वय 13) अल्पवयीन मुलाचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. इनोव्हाचा चालक जैद नसीर शेख (वय 23, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे.

बेशिस्त ट्रक चालकामुळे क्लासला निघालेल्या ११ वर्षीय मुलाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी निवृत्ती हा रविवारी संध्याकाळी सहा वाजता रस्त्याने जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने इनोव्हा चालवित आलेल्या जैदने त्याला धडक दिली. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत निवृत्तीला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे. अपघातप्रकरणी इनोव्हा कारचा चालक जैद नसीर शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने मद्यप्राशन केले होते का, याची तपासणी ससून रुग्णालयात पाठवून केली. त्याचप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी ब्रेथ अनालायझरद्वारे तपासणी केली असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, घटनास्थळी पंचनामा केला असून, तपास पथक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहे.

याप्रकरणी आरोपी चालक जैद नसीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top