Breking News
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावातरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणीफ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविलावन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी तज्ञांची समिती नेमावीवारजेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, एकजण जखमीउधारीवर दारू न दिल्याने कामगाराला बदडलेपावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडलीकुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशपिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्तनिघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड

टोळक्याकडून दहशत; अल्पवयीनांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पद्मावतीतील तळजाई वसाहतीत टोळक्याने दहशत माजवून चार वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने शस्त्रे उगारुन नागरिकांना शिवीगाळ केली. याप्रकरणी अल्पवयीनांसह ५ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. आशुतोष देडे (वय २०), ओम थोरात (वय २०) यांच्यासह पाचजणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये अल्पवयीनांचा समावेश आहे. दीपक कुचेकर (वय ४३, रा. महात्मा गांधी वसाहत, तळजाई वसाहत, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आंदेकर टोळीच्या प्रतिस्पर्धी टोळीतील मोरक्या उदात्तीकरण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देडे, थोरात आणि साथीदार हे तळजाई वसाहतीत राहायला आहेत. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आरोपी आरडओरडा करत वसाहतीत शिरले. ‘आम्ही तळजाई वसाहतीतील भाई आहोत. आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देऊन वसाहतीत दहशत माजविली. रहिवाशांना शिवीगाळ करुन त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली रिक्षा, तसेच तीन दुचाकींची तोडफोड केली. कुचेकर यांनी आरोपींना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी त्यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात टोळक्याने रविवारी रात्री दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. टोळक्याने वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आठवड्यापूर्वी बिबवेवाडीतील पद्मावतीनगर भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर तळजाई वसाहत भागात वाहन तोडफोड करण्याची घटना घडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top