कऱ्हावागज येथील सर्पदंशाच्या रुग्णाचा वेळेत उपचारांनतरही दुर्दैवी मृत्यू

कऱ्हावागज येथील सर्पदंशाच्या रुग्णाचा वेळेत उपचारांनतरही दुर्दैवी मृत्यू

रुग्णाच्या शरीराने उपचारांना साथ न दिल्यामुळे दुर्दैवी मृत्यू 

marathinews24.com

पुणे – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात कऱ्हावागज येथील कांताबाई शंकर नाळे या रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही रुग्णाचे शरीराने उपचारांना साथ न दिल्यामुळे २६ मे रोजी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश उमप यांनी दिली आहे.

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड – सविस्तर माहिती 

कांताबाई शंकर नाळे यांना २६ मे रोजी सकाळी ६.३० वाजता विषारी सर्पदंश झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये उपचाराकरीता दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर ६ वाजून ३६ मिनिटानी आवश्यकतेनुसार उपचार करण्यास सुरुवात केली. रुग्णाला सर्व प्रथम ‘सर्पविष प्रतिबंधक लस (अँटी स्नेक वेनोम)’ इंजेक्शन दिले. प्राथमिक उपचारानंतर रुग्णाला पुढील उपचाराकरिता सकाळी ७.५० वाजता अतिदक्षता विभागामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. तथापि, वेळेत उपचार होऊनही शेवटी त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. उमप यांनी प्रसिद्धीपत्रकांवये दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×