Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पादचारी जेष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली

पुण्यात धुमस्टाईल दागिने हिसकावण्याचा सपाटा कायम

खडकीतील एलफीस्टन रोड परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रूपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना २८ मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खडकीतील एलफीस्टन रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शस्त्राच्या धाकाने तरूणाला लुटले, वानवडीतील घटना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला खडकीत राहायला असून, २८ मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी एलफीस्टन रोड परिसरात चोरट्याने जेष्ठेच्या गळ्यातील ४५ हजार रूपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटा सुसाट पसार झाला. दरम्यान, तक्रार दाखल होताच खडकी पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा ठावठिकाणा शोधण्याची मोहिम हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेदंगुडे तपास करीत आहेत.

स्वागरेट एसटी स्थानकात जेष्ठेला पुन्हा लुटले

स्वारगेट- कोल्हापूर विनाथांबा एसटीमध्ये प्रवेश करीत असलेल्या जेष्ठ महिलेच्या पर्समधील चार हजारांची रोकड आणि ८० हजारांचे दागिने मिळून चोरट्यांनी ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २१ मे रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव, पुणे परिसरात राहणार्‍या ६५ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांनी धुडगूस घातल्याचे चोरीच्या घटनांवरून दिसून आले आहे. स्थानिक पोलिसांचे पेट्रोलिंग नसणे, एसटी प्रशासनाची कुचकामी सुरक्षा यंत्रणेमुळे चोरट्यांचे फावले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×