Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

ताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणी

पाेलीसांकडूनमहिला आराेपी जेरबंद

marathinews24.com

पुणे -अशिक्षित व अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना वकील असल्याची बतावणी करीत ६ लाखांची खंडणी उकळणाऱ्या तोतया वकील महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय- ३२) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

मुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेपासून साेडचिठ्ठी घेऊन देण्याचे सांगत आरोपी कांबळे हिने फिर्यादी सातपुते यांच्याकडून ५ लाख ९४ हजार रुपये घेतले. फिर्यादी सातपुतेविरुध्द सुनेने बलात्काराची व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर महिला आयाेगाकडे सासरचे व्यक्ती विराेधात तक्रार दिली असल्याचे खाेटे कारण सांगून, आरोपी कांबळे हिने अटक हाेईल अशी भिती घातली. वेळाेवेळी खाेटी माहिती देऊन त्यांना वारंवार अटक करण्यात येईल असे सांगत त्यांच्याकडून ५ लाख ९४ हजार रुपये घेतले.

सातपुते यांनी पाेलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना हकीगत सांगितली. त्यानुसार, लाेणीकाळभाेर पाेलीसांनी स्वतंत्र पथक तयार करुन सेन्हल कांबळे हिला तक्रारदारकडून १५ हजार रुपये खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडले.

महिलेने अशाचप्रकारे वकील असल्याचे सांगून अनेक नागरिकांची फसवणुक केली असल्याची माहिती पाेलीसांना प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांना ज्यांची फसवणुक झाली आहे, त्यांनी लाेणीकाळभाेर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×