Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

महिलेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – महिलेचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आला. ही महिला २० मे रोजी रात्री नऊच्या सुमारास शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या सेवा रस्त्यावर बेशुध्दावस्थेत सापडली होती.।उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. प्रिती सचिन वखारे (वय ३१ रा. खोपडेनगर ) असे मृत महिलेचे नाव आहे.

तोतया महिला वकिलावर आणखी एक गुन्हा दाखल – सविस्तर

पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवरून आंबेगाव पठार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी प्रिती वखारे यांना अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दिनांक २१ मे रोजी पहाटे तीचा मृत्यू झाला. पोलीस तपासादरम्यान महिलेला डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, त्या धारदार हत्याराने झाल्या आहेत. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसारही मृत्यूचे कारण “डोक्याला इजा असे नमूद केले आहे. प्रिती वखारे या नवले पुल परिसरात कामासाठी गेल्यानंतर तिथे त्यांचे काही अनोळखी व्यक्तींशी वाद झाले होते.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३ (१) अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या घटनेविषयी काहीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×