Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

गांजा विक्री करणारा तस्कर गजाआड

गांजा विक्री करणारा तस्कर गजाआड

८ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – गांजा विक्री करणाऱ्या तस्कराला वाघोली पोलिसांनी अटक केली. वाघोली-लोहगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी ८ किलो ४०२ ग्रॅम गांजा जप्त केला. सुरेश साहेबराव पाटील (वय ४४, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाघोली-लोहगाव रस्त्यावर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पाटील गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली.

पुण्यात विवाहितेचा छळ प्रकरणात ३ गुन्हे दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी सापळा लावून पाटील याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ६९ हजार ३४० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाटील याला न्यायालायने २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरोपी पाटील गांजा कोणाला विकणार होता, तसेच त्याने कोणाकडून गांजा आणला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल, रामचंद्र पवार, संदीप तिकोणे, प्रदीप मोटे, नामदेव गडदरे, विशाल गायकवाड, समीर भोरडे यांनी केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×