Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

माहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

शासन सेवेत प्रामाणिकपणे सेवा निभावण्याला महत्त्व – उपसंचालक डॉ. किरण मोघे

marathinews24.com

पुणे – पुणे विभागीय माहिती कार्यालयातील वाहनचालक श्री. विलास मारुती कुंजीर हे ३० वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय सेवेत शासन-प्रशासनाशी प्रामाणिक राहून सेवा निभावण्याला महत्त्व असून श्री. कुंजीर यांची कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावना वाखाणण्याजोगी आहे, असे कौतुकोद्गार माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी याप्रसंगी काढले.

बारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण – सविस्तर बातमी 

सत्कार समारंभाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे,  कुंजीर यांची पत्नी सुरेखा कुंजीर व सर्व कुटुंबीय तसेच विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

माहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

उपसंचालक डॉ. मोघे म्हणाले, शासकीय सेवा करत असताना नियुक्ती ते सेवानिवृत्ती या दोन बिंदूंमधील प्रवास सुखकर करुन इतरांना आनंद देता येणं महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेऊन काम केल्यास शासन सेवेतील कालावधी सुखकर होतो. वरिष्ठांच्या शब्दाला नेहमीच मान देतांना सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय ठेवता आल्याने कुंजीर यांचा शासकीय सेवेतील प्रवास सुखकर झाला. सेवानिवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ द्यावा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा, स्वत:च्या व कुटुंबियांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णू शिंदे यांनी देखील वाहनचालक आणि कॅमेरामन अशा दोन भूमिका एकाच वेळी निभावून शासनाची प्रामाणिकपणे सेवा केली. वाहनचालक पदावर काम करत असूनही फोटोग्राफीमध्ये कौशल्य त्यांनी दाखवले, असे कौतुकोद्गार डॉ. मोघे यांनी काढले. त्यांनी यावेळी कुंजीर व शिंदे यांना सेवापूर्तीनिमित्त पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. रवींद्र ठाकूर, सचिन गाढवे, विलास कसबे तसेच सुनील झुंजार यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×