Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो असं सांगून केली फसवणूक 

सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो केली फसवणूक 

फसवणूक करणार्‍यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – अनाथांची माय दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करुन आरोपींनी तरुणांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील आश्रमात लग्नासाठी मुली असल्याची बतावणी करीत तरूणांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना फोन करून रजिस्ट्रेशनसाठी १५ हजारांवर ऑनलाईन रक्कम घेण्यात आली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी आरोपींविरूद्ध ३१९ (४), ३१८ (४), ३५६ (२), आयटी अ‍ॅक्ट ६६ या कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजन – सविस्तर बातमी 

दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत अशी बतावणी करीत संबंधितांनी अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींनी तरूणांकडून रजिस्ट्रेशनसाठी प्रत्येकी १५ हजार रूपये घेतल्याचे दिसून आले आहे. फोन पेसह गुगल पेद्वारे रक्कम स्वीकारली असून, यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी ममता सपकाळ यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आता संबंधित आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, मुलांच्या लग्नासाठी पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून मोजेल ती किंमत मोजायला तयार असल्याचेही दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×