महसूल न्यायप्रक्रियेतील प्रलंबित दाव्यांना सामंजस्याने आणि तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी लोकअदालत
marathinews24.com
बारामती – उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती व इंदापूर तहसीलदार कार्यालयांमध्ये सोमवार दि.9 जून रोजी ‘महसूल लोकअदालत’ आयोजित केली आहे. महसूल न्यायप्रक्रियेतील प्रलंबित दाव्यांना सामंजस्याने आणि तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी लोकअदालत पार पडणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
चांडोली येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन – अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
इंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन -अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
महसूल विभागात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे दावे अनेकदा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र, या लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांचे एकमत झाल्यास तडजोडीतून दावे निकाली काढले जाणार आहे. ही महसूल लोक अदालत उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती व तहसिल कार्यालय इंदापूर येथे सकाळी 11 वाजलेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहील. सर्व तडजोड होऊ शकेल अशा दाव्यातील पक्षकारांनी प्रकरण लोकअदालतीत मांडून मार्ग काढावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी केले आहे.