Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

शिरुर, मावळ मधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

शिरुर, मावळ मधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल

marathinews24.com

पिंपरी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल केले आहेत. युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी, चिंचवड विधानसभा) राजेंद्र तरस यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध नियुक्त्या केल्या आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवा सेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, किरण साळी, युवासेना सचिव पच्शिम महाराष्ट्र विश्वजीत बारणे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

त्यामध्ये युवासेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी-चिंचवड) राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा) अध्यक्षपदी विशाल हुलावळे, युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष (भोसरी – खेड विधानसभा) अजिंक्य उबाळे, युवासेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा सागर पाचार्णे, युवासेना मावळ तालुकाध्यक्ष राजेश वाघुले, युवासेना पिंपरी-चिंचवड उपशहराध्यक्ष सुजित कांबळे, रविंद्र शेलार, दिगंबर गुंजाळ, युवासेना भोसरी विधानसभा उपशहराध्यक्ष ऋषिकेश कुकडे, युवासेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष रोहित बांगर, युवासेना चिंचव़ड विधानसभा उपाध्यक्ष सागर शिंदे,

सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपाध्यक्ष अनिरूद्ध जाधव, युवासेना विभागउपाध्यक्ष गौरव राउळ यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेची ताकद युवा संघटना आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवकांना संधी दिली जाईल. त्यासाठी युवकांनी संघटन मजबूत करावे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेले जनहिताची कामे लोकांपर्यंत पोहचवावित. आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जनतेसाठी काम करित आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून लोकोउपयोगी कामे केली जात आहेत. ही कामे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवावीत. सरकारच्या योजानांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×