Breking News
व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीलाPune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हे

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

समर्थ पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल

marathinews24.com

पुणे– एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने बँक खात्यातून एक हजार रुपये लांबविल्याची घटना सोमवार पेठेत घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सोमवार पेठेत राहायला आहेत. ते गुरुवारी रात्री आठच्या सुमारास राज लाॅजसमोरील एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी चोरटा एटीएम परिसरात थांबला होता. त्यांच्यमागोमाग चोरटा एटीएममध्ये शिरला. त्याने त्यांना मदत करण्याचा बहाणा करुन डेबिट कार्ड मागितले. चोरट्याने त्यांच्याकडील डेबिट कार्ड स्वत:जवळ ठेवले आणि चोरट्याने त्याच्याकडील डेबिट कार्डचा वापर केला. ज्येष्ठाकडून त्याने सांकेतिक शब्द घेतला होता.

पैसे न मिळाल्याने चोरट्याने त्याच्याकडील डेबिट कार्ड ज्येष्ठाकडे दिली. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी केली. त्यानंतर चोरटा तेथून निघून गेले. ज्येष्ठाच्या डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून एक हजारांची रोकड चोरुन नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस फौजदार संतोष पागार तपास करत आहेत.आठवड्यापूर्वी खडकी पोलिसांनी एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक प्रकरणात उत्तर प्रदेशातील चोरट्यांना अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×