Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पिस्तूलाच्या धाकाने मारहाण करणार्‍याला अटक

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

विश्रांतवाडी क्रॉप्स २४, तपास पथकाची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पिस्तूलाच्या धाकाने एकाला बेदम मारहाण करणार्‍या आरोपीला विश्रांतवाडी क्रॉप्स पोलिसांसह तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून इटालियन बनावटीचे ५० हजारांचे पिस्तूल, ३२ एम एम राऊड असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तौफीक ऊर्फ रकीब रफीक शेख (वय ३२ रा. सावंत पेट्रोल पंपासमोर, श्रमीक वसाहत येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

चुलत्याचा खून, चुलतभावावर प्राणघातक हल्ला – सविस्तर बातमी 

विश्रांतवाडीतील टिंगरेनगर लेन नं ११ मध्ये एकजण हातात पिस्टल घेवून भांडणे करत आहे, असा डायल ११२ नंबरवर ४ जूनला संध्याकाळी साडेचार वाजता कॉल प्राप्त झाला. त्यानुसार आळंदी मार्शलचे अंमलदार लंघे, माळी यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार बादरे, भुसारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपी तौफीक ऊर्फ रकीब रफीक शेख वय ३२ हा एकाला मारहाण करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल मिळून आले.

शेखविरुध्द विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं १३८/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ११५ (२), ३५२, ३५१ (३) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे शहर, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश हांडे, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, बबन वणवे, यशवंत किर्वे, माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×