Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात एटीएम मशीनमध्ये छेडछाड, सराईत टोळीचा पर्दापाश

पुण्यात एटीएम मशीनमध्ये छेडछाड, सराईत टोळीचा पर्दापाश

समर्थ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे –  एटीएम मशीनमध्ये छेडछाड करीत नागरिकांची लुबाडणूक करणार्‍या टोळीचा समर्थ पोलिसांनी पर्दापाश केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, वेगवेगळया बॅकांचे चार एटीएम कार्ड, एटीएम मशीनचे कॅश शटरला लावलेली काळ्या रंगाची पट्टी जप्त केली आहे. संतोष कुमार किशोरीलाल सरोज (वय २८ रा. मु. पो. पुरे बैसरो कटरा गुलाग सिंग, ता. प्रतापगढ जिल्हा प्रतापगढ उत्तर प्रदेश) आणि प्रदिप कुमार नंदकिशोर मौर्या (वय २६ रा. मु.पो.मानधाता ता. प्रतापगढ जिल्हा प्रतापगढ उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रुबी हॉलध्ये काम करणार्‍या डॉक्टरने वसतीगृहात घेतला गळफास – सविस्तर बातमी 

रास्ता पेठेतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून तक्रारदाराने ५ जूनला रक्कम काढली होती. मात्र, त्यांना पैसे न मिळता बँकखात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधिताने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलीस पथकाने राज रेस्टॉरंट समोरील बॅक ऑफ इंडियाचे एटीएम बाहेर सापळा रचला. ६ जूनला दोघाजणांनी एटीएम सेंटरमध्ये जाउन स्क्रू ड्रायव्हरने मशीनशी छेडछाड करताना दिसून आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी संतोष कुमार सरोज आणि प्रदिप मौर्या यांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी ५ जूनला संबंधित एटीएम मशीनमधील पैसे निघण्याच्या ठिकाणी एक काळी पट्टी लावली असल्याचे सांगितले. त्या पट्टीमध्ये अडकलेले पैसे घेण्यासाठी आल्याची कबुली आरोपींनी दिली.

दोन्ही आरोपी परप्रांतीय असून, त्यांच्याविरूद्ध यापुर्वी एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सराईतांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोकड, चार एटीएम कार्ड, काळी पट्टी असा ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, (अतिरीक्त कार्यभार) सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक(गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पागार, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे,शरद घोरपडे, भाग्येश, यादव यांनी केली.

एटीएम मशीनमध्ये पैसे निघण्याच्या ठिकाणी काळी पट्टी लावून आरोपी हे फसवणूक करीत होते. नागरिकांनी मशीनमध्ये गोपनीय पीनकोड टाकूनही त्यांना पैसे न मिळता, बँकखात्यातून वजावट होत होती. ही रोकड काळी पट्टी चिकटवल्यामुळे मशीनमध्ये अडकत होती. त्यानंतर आरोपींकडून पट्टी काढून घेत रोकडवर डल्ला मारला जात असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघा सराईतांना अटक केली असून, आणखी तपास सुरू आहे. – उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×