Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

छळाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

दुभाजकावर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू भरधाव

पतीला अटक, तळेरानवाडी रोड केसनंदमधील घटना

marathinews24.com

पुणे – सासरच्या छळासह माहेरहून सतत पैशांच्या मागणीला कंटाळून महिलेने इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना ७ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास वाघोली परिसरातील तळेरानवाडी रोड केसनंदमधील ओम निवास इमारतीत घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली असून, इतरांविरूद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात एटीएम मशीनमध्ये छेडछाड, सराईत टोळीचा पर्दापाश – सविस्तर बातमी 

स्वाती सुरज पाठक (वय २० रा. तळेरानवाडी रोड केसनंद, हवेली ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सूरज राजेंद्रप्रसाद पाठक (वय २६ रा.तळेरानवाडी रोड केसनंद, हवेली) याला अटक करण्यात आली आहे. ५३ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि स्वाती यांचे ६ मार्च २०२४ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर स्वाती केसनंद परिसरात पती सूरज आणि इतर नातेवाईकांसोबत राहत होती. मात्र, काही महिन्यातच तिला सासरच्या लोकांनी छळ करण्यास सुरूवात केली. तिला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला. दरदिवशी टोचून बोलत तिचा अपमानही करीत छळ केला. सततच्या त्रासाला कंटाळून स्वातीने ७ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास राहत्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनायक आहिरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×