कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणींबाबत, फंडिंगचे विविध प्रकार, लोन प्रपोजल, लोन प्रक्रिया यांची माहिती, आपला व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची ओळख कशी निर्माण करावी, आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी सुधारायची याबाबत प्रोत्साहनकरिता १३ जून २०२५ रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अॅड कॉमर्स कॉलेज, शिवाजीनगर पुणे येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील विविध क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त लघुउद्योजक यांनी सहभागी व्हावे व आपल्या सहभागाबाबतची नोंदणी https://forms.gie/1mTU5sJnruXWxPhz8 या लिंकवर करुन लघुउद्योजक यांनी प्रशिक्षणाचा लाभघ्यावा असे आवाहन सा. वा. मोहिते, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दुरध्वनी क्रमांकावार संपर्क करावा.