Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे : व्यावसायिकाला मारहाण करणारे अटकेत

पुणे : व्यावसायिकाला मारहाण करणारे अटकेत

गुन्हे शाखा युनिट तीन आणि वारजे पोलिसांच्या पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – व्यावसायिकाला मारहाण करून पसार झालेल्या सराइतांना पोलिसांनी पकडले आहे. गुन्हे शाखा युनिट तीन आणि वारजे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आशितोष नारायण साठे (वय २२, रा. मुळशी), ओम सचिन वनकुद्रे (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणात साठे आणि वनकुद्रे यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांना अटक केली होती.

वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

तक्रारदार भंगार माल खरेदीचा व्यवसाय करतात. आरोपी साठे, वनकुद्रे आणि साथीदारांनी व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या टेम्पो चालकाला अडवून दारुसाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने टेम्पाची काच फोडली होती, तसेच त्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर व्यावसायिक, त्यांचा मुलगा आणि भाच्याने आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार आणि पथकाने कारवाई करून पसार आरोपी साठे आणि वनकुद्रे यांना अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×