Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन

पुणे शहर आठवड्यात फ्लेक्समुक्त करणार

1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद

marathinews24.com

पुणे – राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश असून नागरिकांनी वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेत दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे कामकाज गतीने सुरू आहे, याकामात अधिक गतीमानता येण्याकरीता विशेष उपाययोजना करण्याकरीता आयुक्तालयाच्यावतीने निर्देश देण्यात आले आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जून्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी बसविल्याशिवाय १६ जून २०२५ पासून करण्यात येणार नाही.

तथापि, वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास त्या पावतीची खातरजमा करून त्यांच्या वाहनांचे कामकाज करण्यात येईल. १६ जून २०२५ पासून एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांचे कामकाज करण्यात येणार नाही, असे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×