Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

वाहने रस्त्यात बंद पडून वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठीची उपाययोजना

marathinews24.com

पुणे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची संबंधित वाहनचालकांनी १९ जून २०२५ पर्यंत तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण – सविस्तर बातमी 

पालखी सोहळ्यावेळी देहू, आळंदी ते पंढरपूर या दरम्यान पालखी मार्गावर प्रवासी तसेच जड वाहने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, वाहने रस्त्यात बंद पडून वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठीची उपाययोजना म्हणून वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आळंदी रोड चाचणी मैदान व दिवे येथील टेस्ट ट्रॅक येथे कार्यालयीन वेळेत वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घ्यावी.

वाहन तपासणीवेळी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती व वाहतूक परवाना मुदतीत असल्याबाबतचे सर्व कागदपत्रे सोबत घेवून जावे. ही तपासणी विनामूल्य असून वाहन तपासणी केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनचालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×