Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

नवले पुलाजवळ ज्येष्ठ महिला नाल्यात वाहून गेली

मृतदेह वारजे माळवाडी परिसरात आढळला

marathinews24.com

पुणे – पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यात पडून जेष्ठ महिला वाहून गेल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले ब्रीज परिसरात गुरुवारी रात्री घडली. अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध घेण्यासाठी माेहीम राबविण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी महिलेचा मृतदेह वारजे स्मशानभूमीजवळ मिळून आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

टेम्पोतील तांब्याच्या चारा चोरणारे अटकेत – सविस्तर बातमी

शोभा मनोहर महिमाने (वय ६५ , दर्शन पार्क, फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. Thisपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा महिमाने कोल्हापूरला नातेवाईकांकडे गेल्या होत्या. गुरुवारी रात्री परतल्यावर नवले ब्रीज परिसरात पाऊस झाला. बसमधून उतरल्यावर शोभा पायी चालत नवले पूल परिसरातून रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडून रिक्षा थांब्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी तेथून वाहणाऱ्या पाण्यात शोभा पडल्या. पावसामुळे नाल्याला पूर आला होता. पाण्यात पडून त्या वाहून गेल्या, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

नवले पूल परिसरातील नाल्याजवळ अंधार असल्याने गुरुवारी रात्री शोधमोहीम राबविण्यात अडचण आली. मात्र, महिलेची चप्पल नाल्याजवळ सापडली. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटीपर्यंत जवानांनी नाल्याच्या परिसरात शोध घेतला. वारजे माळवाडी परिसरात असलेल्या स्मशानभूमीजवळ शोभा यांचा मृतदेह मिळून आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×