Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

टेम्पोतील तांब्याच्या तारा चोरणारे अटकेत

४९५ किलो तांब्याच्या तारा जप्त

marathinews24.com

पुणे – हॉटेल परिसरात पार्किंग केलेल्या टेम्पोतून ४९५ किलो तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. चोरलेल्या तारांची किंमत ३ लाख रुपये आहे.

मैत्रिणीच्या छळामुळे तरुणाने केली आत्महत्या; लॉजमध्ये घेतला गळफास – सविस्तर बातमी

सूरज शाम जाधव (वय १९), यश अजित सावंत (वय २१), महेश बसवराज पुजारी (वय २२, तिघे रा. चव्हाणवस्ती, थेऊर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत समाधान हिराजी डोंगरे (रा. थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना ६ जूनला रात्री अकराच्या सुमारास थेऊर गावातील जय मल्हार हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत घडली.

टेम्पोत जुन्या आणि जळालेल्या तांब्याच्या तारांचे एकूण ५५ पोती ठेवली होती. मध्यरात्रीच्या सुमारास या चोरट्यांनी तारा चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचे दिसून आले. पोत्यांमध्ये एकूण ४९५ किलो वजनाच्या तीन लाख १ हजार ९५० रुपयांच्या तांब्याच्या तारा होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तांत्रिक तपासात पाेलीस कर्मचारी प्रदीप गाडे, राहुल कर्डीले यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×