Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

मैत्रिणीच्या छळामुळे तरुणाने केली आत्महत्या, लॉजमध्ये घेतला गळफास

गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्या

तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मैत्रिणीकडून होणाऱ्या छळामुळे जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने नवले पुलाजवळील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, रा .संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिकचा भाऊ तंगराज बाबू शेट्टीयार (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.

चालकांनी मारला ब्रेक अन लोखंडी सळ्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक हा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. तरुणी ही नृत्याचे कार्यक्रम करते. दोघांमध्ये मैत्री झाली होती. ३० एप्रिलला दोघे नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये गेले होते. दोघांमध्ये वाद झाल्यावर कार्तिकने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिकचे नातेवाईक आणि मित्रांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होेते.पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

कार्तिकच्या सांगण्यावरून त्याच्या मित्रांनी तरुणीला पैसे दिले हाते. संबंधित तरुणीची माहिती तंगराज यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत कार्तिककडे विचारणा केली असता, संबंधित तरुणी ही मैत्रीण असल्याचे त्याने तंगराज यांना सांगितले होते. तरुणी त्रास देत असून, तिच्या त्रासामुळे आत्महत्या करावे लागेल, असे कार्तिकने तंगराज यांना सांगितले होते. कार्तिकच्या आत्महत्येस तरुणी जबाबदार असल्याचा तंगराज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×