Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हे

विविध शाळा आधुनिक होत असतांना शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढवणे गरजेचे – डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – विविध शाळा आधुनिक होत असतांना शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याचे आपल्यासमोर आव्हाने असून याकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक विचार, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबत विकसीत भारताकडे वाटचाल करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत विचार करावा. असे डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या.

शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे –  उपमुख्यमंत्री अजित पवार

असर संस्थेच्या अहवालानुसार पुणे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने सुट्टीच्या काळात विद्यार्थ्याचे उन्हाळी वर्ग घेतले आहेत, याबद्दल जिल्हा परिषद आणि पालकांचे अभिनंदन केले. राज्यातील शाळेत ‘सखी सावित्री समिती’ शाळेत स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि मुलींची सुरक्षितता होण्यास मदत झाली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये शाश्वत विकासाची ध्येय आणि दुर्ग किल्ल्याच्या विकासाच्याकरीता विशेष लक्ष दिले आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात 3 हजार 546 शाळांपैकी 303 शाळा या पुणे मॉडेल स्कूल व 108 पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्याकरीता जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे केवळ आधुनिकीकरण करण्यासोबतच त्या माध्यमातून दर्जेदार आणि सर्वसमावेशक सेवा देणे हा मुख्य उद्देश आहे, असे पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुणे मॉडेल स्कुल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; मॉडेल स्कुल लोगो तर भुसे यांच्या हस्ते ‘पुणे निपुण’ डॅशबोर्डचे अनावरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुणे मॉडेल स्कुल उभारणीकरीता सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या एकूण 7 संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसचे ‘ज्ञानदर्शन’ कृतीपुस्तिका संचाचे अनावरण तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा’ टप्पा क्र.२ जिल्ह्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी पवार यांच्या हस्ते हुंडई मोटर इंडिया फाउंडेशनच्यावतीने मावळ तालुक्यातील टाकवे आणि येळसे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दोन अत्याधुनिक अँडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच शाळा, ग्रामीण आणि दुर्गम भागात कौशल्य शिक्षणाचा प्रसार, शिक्षक व प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देणाऱ्या प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×