Breking News
वारजेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, एकजण जखमीउधारीवर दारू न दिल्याने कामगाराला बदडलेपावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडलीकुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशपिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्तनिघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजराशाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतपीएमपीएल बसप्रवासात जेष्ठाचे चैन चोरीलातरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना…शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडली

पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणीझाडे पडली

marathinews24.com

पुणे – शहरात झालेल्या पावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले.

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश – सविस्तर बातमी

मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मध्यरात्रीनंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे, तसेच फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत १३ ठिकामी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली.

मध्यवर्ती प्रभात रस्ता गल्ली क्रमांक १४, पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी, पाषाण परिसरातील सोमेश्वरवा़डी, बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, कोथरूडमधील महात्मा सोसायटी, सिंहगड रस्त्यावरील नित्यानंद हाॅल, सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक, महापालिका भवन, घोरपडीतील सोपानबाग, बिबवेवाडीतील हाॅटेल रुपाली, खराडीतील ठुबेनगर, कोथरूडमधील रामबाग काॅलनी परिसरात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

फडके हौद चौक परिसरात जुन्या वाड्याची भिंत कोसळली

मध्यभागातील फडके हौद चौक परिसरातील जुन्या वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली, तसेच सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एक जाहिरात फलक कोसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top