Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

फ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

हडपसरमधील घटना

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागातील एका सोसायटीत घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, एकजण जखमी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसरमधील गोपाळपट्टी परिसरातील जय मल्हार सोसायटीत राहायला आहेत. १३ जूनला तक्रारदार आणि कुटुंबीय हे बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून १ लाख ३८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. हडपसर भागातील वैभव चित्रपटगृह परिसरातील फ्लॅटमधून ३९ लाखांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.

घरकाम करणार्‍या महिलेकडून ऐवज लंपास

घरकाम करणार्‍या महिलेने १ लाख १५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घरी घरकामासाठी एक महिला यायची. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातून १ लाख १५ हजारांचे दागिने चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

घरकाम करणारी महिला ऐवज चोरुन पसार झाल्यानंतर ती कामावर आली नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेचा संशय बळावला. त्यांनी तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×