Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

सिमेंटचा गट्टू मारून एकाचा खून करण्याचा प्रयत्न

सिमेंटचा गट्टू मारून एकाचा खून करण्याचा प्रयत्न

सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पिंपरी – बहिणीचा नाद सोडत नसल्याच्या कारणावरून मामा भाचाने मिळून एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी पिंपळेनिलख, रक्षक चौक येथे घडली. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मल्हारी नवनाथ जोगदंड उर्फ बाबा, तेजस चव्हाण (दोघेही रा. रहाटणी) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी महिलेचा पती संदिप रामचंद्र साठे आणि आरोपी मल्हारी हे दोघे एकमेकाचे मित्र आहेत.

आळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनी – सविस्तर बातमी 

संदिप साठे हे त्यांचा मित्र बाळू भिवा पवार याला रिक्षातून घेऊन आरोपी मल्हारी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रहाटणी येथील त्याच्या घरी गेले होते. वाढदिवस साजरा करून संदिप आणि बाळू हे दोघेही रिक्षातून परत घरी जात होते. त्यावेळी आरोपी मल्हारी आणि त्याचा भाचा आरोपी तेजस हे दुचाकीवरून रिक्षाचा पाठलाग करत आले. पिंपळेनिलख येथील रक्षक चौकात रिक्षाला दुचाकी आडवी लावली. त्यानंतर आरोपींनी संदिप साठे यांना रिक्षातून बाहेर रस्त्यावर ओढले.

त्यानंतर माझ्या बहिणीचा नाद सोडून दे, पण तू माझे काही ऐकत नाही. तुला आज जिवंत ठेवत नाही, असे म्हणून आरोपी मल्हारी याने रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून संदिप साठे यांच्या डोक्यात, तोंडावर व जबड्यावर मारून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×