गांधीनगर, पिंपरी येथील घटना
marathinews24.com
पिंपरी – मोहरम सणासाठी गावाकडे निघालेल्या तरुणाला तिघांनी अडवून आमच्या बहिणीचे आधारकार्ड तुम्ही घेतले आहे, असे म्हणत खिशात हात घालून १५ हजार रोख हिसकावून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी गांधीनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी मोहम्मद शाहनवाज आफताफ आलम (वय २३, रा. गांधीनगर, पिंपरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश बाळू मंडपे (वय ३३), संतोष रामकंपा (वय ३०), प्रबुद्ध सुरेश रोकडे (वय २३, सर्व रा. पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी हे फॅब्रिकेशनचे काम करतात.
सिमेंटचा गट्टू मारून एकाचा खून करण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी
ते त्याचा भाऊ व मित्रासोबत मोहरम सणाला मूळ गावी जाण्यासाठी पिंपरी रेल्वे स्टेशन येथे चालले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले आणि फिर्यादी यांना पिंपरीतील लोखंडे सभागृहाजवळ अडवले. फिर्यादी यांच्या जवळ जाऊन आमच्या बहिणीचे आधार कार्ड तुम्ही घेतले आहे असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाच्या पॅन्टच्या खिशात हात घालून १५ हजार रोख काढून घेतले. तसेच फिर्यादी फिर्यादीचा भाऊ आणि मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुचाकीवरून पळून गेले. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.






















