Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

कोथरूडमध्ये तडीपार गुंडाला पकडले

युनीट तीनची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने कोथरूड भागात पकडले आहे. अक्षय शांताराम सावंत (वय ३०, रा. शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र, तरीही तो न्यायालयाच्या पुर्वपरवानगीशिवाय कोथरूडमध्ये आला होता. तो १८ जूनला काकाच्या घरी सागर कॉलनीमध्ये आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सागर कॉलनीत सापळा रचून ताब्यात घेतले.

सासूने हुंड्यासाठी छळले, सुनेने गळफास घेउन केली आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी सराईत अक्षय सावंत याला पाठलाग करून पकडले. त्याला ११ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन तो शहरात आला होता. त्याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारू, पोलीस कर्मचारी अमोल काटकर, विशाल भिलारे, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे आणि पथकाने ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×