Breking News
मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरलाजनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

Crime News : गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करून महिलेला ऑनलाईन गंडा

डॉक्टर महिलेला ५लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील डॉक्टर महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक करुन बँक खात्यातून परस्पर रोकड लांबविल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत डॉक्टर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वीज, गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवित ऑनलाईन लुट केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अशा मेसेजसह बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोक्का कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय डॉक्टर महिला कर्वेनगर भागातील सहवास सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गॅस कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. गॅस बिल थकीत असून, गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी धमकी दिली होती.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एमएनजीएल एपीके फाईल पाठविली. ही फाईल त्यांना उघडण्यास सांगितले. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक केला. मोबाइलमधील बँक खात्याची गोपनीय घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये लांबविले. खात्यातून रक्कम दुसर्‍याच खात्यात वळविल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

सराफी पेढीतून ५ लाखांचे दागिने लंपास, कोंढव्यातील घटना

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी ५ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी सराफी पेढीतील कर्मचार्‍याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपनगरात सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. संबंधित महिलांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागात प्रसिद्ध सराफी पेढीचे दालन आहे. सराफी पेढीत २२ जूनला दोन महिला खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. महिलांनी बुरखा परिधान केला होता. त्यांनी सराफी पेढीतील कर्मचार्‍याला महिलांना सोन्याच्या बांगड्या दाखविण्यास सांगितले. त्यानंतर कर्मचार्‍याने त्यांना बांगड्या दाखविल्या. प्लास्टिक ट्रेमधील बांगड्या पाहण्याचा बहाणा महिलांनी केला.

त्यानंतर कर्मचार्‍याला बोलण्यात गुंतविले. कर्मचार्‍याचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलांनी ५ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या चोरून नेल्या. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×