Breking News
महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वार

Mumbai : महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबै बँकेचा पुढाकार

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे 

marathinews24.com

Mumbai : महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबै बँकेचा पुढाकार – महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक ४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला बचत गट व व्यावसायीकांना कर्जसुविधा आणि बाजारपेठ निर्मितीशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

श्रीपाद सोलापूरकर, सुशील शिरसाट, ईक्बाल दरबार यांना शब्दसुमनांजली अर्पण; पूना गेस्ट हाऊसच्या मंचावर कलाकारांनी दिला आठवणींना उजाळा – सविस्तर बातमी

यावेळी विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, १९९० च्या दशकात सुरू झालेली बचत गट चळवळ ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया ठरली आहे. १०-२० रुपयांपासून सुरू झालेली बचत आज हजारो महिलांना स्वावलंबी करत आहे. महिलांनी अंगणवाडी पोषण आहार पुरवठा, शिवणकाम, पाककला, आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे.

Mumbai : महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबै बँकेचा पुढाकार

त्यांनी असेही स्पष्ट केले की, महिलांना व्यवसाय सुरू करताना प्रशिक्षण, मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बँकांशी समन्वय साधणे ही जबाबदारी शासन आणि सहकारी संस्थांची आहे. मुंबै बँकेसारख्या संस्थांनी यामध्ये पुढाकार घेणे अत्यंत स्वागतार्ह आहे, असे त्या म्हणाल्या. यासोबतच, व्यवसाय कल्पना गोळा करून त्यावर आधारित प्रकल्प पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.

मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे गटनेते मा. ना. प्रवीण दरेकर यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेने घेतलेले उपक्रम स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “महिलांना फक्त आर्थिक मदत पुरवणे पुरेसे नाही; त्यांना त्यांची क्षमता सिद्ध करता येईल, असे व्यासपीठही आवश्यक आहे.” त्यांनी ‘लाडकी बहिण योजना’, झिरो बॅलन्सवर खाते उघडण्याची सुविधा, आणि महिला बचत गटांसाठी उपलब्ध ३४ वेगवेगळ्या कर्ज योजनांची माहिती दिली.

महिलांसाठी बँकेमार्फत ‘प्रोडक्ट ऑर्डरिंग’, ‘मार्केटिंग’, आणि प्रशिक्षण या बाबींमध्ये सहकार्य मिळेल, असेही त्यांनी आश्वासन दिले. याशिवाय, मुंबै बँकेच्या सर्व शाखांनी पुढील ८ ते १० दिवसांत महिलांकडून व्यवसाय कल्पना संकलित करून त्यावर आधारित योजना विकसित कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानपरिषद आमदार श्रीमती मनीषा कायंदे यांनी महिलांमध्ये असलेल्या सुप्त उद्योजकतेचा उल्लेख केला.
आमदार श्री प्रसाद लाड यांनी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघात हजारो महिलांना व्यवसायासाठी कर्ज, मशिनरी आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही धोरणे फक्त निवडणुकांसाठी नव्हेत, तर महिलांच्या दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनासाठी आहेत, हे त्यांनी ठामपणे सांगितले.

या बैठकीस मुंबै बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, संचालक मंडळ सदस्य, तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शीतल म्हात्रे, कला शिंदे, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, वीणा भागवत आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सहकारी बँकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून महिला सबलीकरणासाठी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, यावर सर्वांनी भर दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×