Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण

Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण

हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरातील घटना

marathinews24.com

Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण – जुन्या वादाच्या रागातून टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना ४ जुलैला रात्री सव्वा आठच्या सुमारास हडपसरमधील शिंदेवस्तीवरील एसआरए इमारतीखाली घडली आहे. टोळक्याने लोखंडी हत्यार, काठी, काचेची बाटली, दगड, फरशी गोट्याच्या साह्याने तक्रारदारावर हल्ला चढविला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काकासो शिरोळे (रा. कसबा पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ऋषीकेश बागूल (रा. शिंदेवस्ती हडपसर) याच्यासह इतर ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्युत मोटार चोरट्यांचा धुमाकूळ; दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीतील शेतकर्‍यांमध्ये संताप – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषीकेश बागूल आणि काकासो शिरोळे यांचे जुने वाद असून, त्याच वादातून आरोपीने टोळक्याला बोलावून घेतले. ४ जुलैला रात्री सव्वा आठच्या सुमारास हडपसरमधील शिंदेवस्तीवरील एसआरए इमारतीखाली त्यांनी शिरोळे यांना गाठले. त्याठिकाणी त्यांच्यावर लोखंडी हत्यार, काठी, काचेची बाटली, दगड, फरशी गोट्याच्या साह्याने तक्रारदारावर हल्ला चढविला. त्यामुळे शिरोळे गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले असून, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हे तपास करीत आहेत.

ट्रक चालकाने पादचार्‍याला उडविले, खडकीतील घटना

भरधाव ट्रक चालकाने बेदरकारपणे गाडी चालवित एका पादचार्‍याला उडविल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना ७ जुलैला सकाळी पावणेसातच्या सुमारास खडकीतील पोस्ट कार्यालयाजवळ घडली आहे. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ५५ वर्ष असून, त्यांची ओळख पटू शकली नाही, अशी माहिती खडकी पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल राठोड यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेली अनोखळी व्यक्ती ७ जुलैला खडकी परिसरातील पोस्ट कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव ट्रक चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी धाव घेतली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात अपघांताचे सत्र कायम असून, अवजड वाहन चालकांकडून बेफिरपणे वाहने दामटली जात आहेत. त्यामुळे पादचार्‍यांसह वाहन चालकांना हकनाक आपला जीव गमवावा लागत आहे. अपघातप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×