पुणे : खोदकाम करताना खांब कोसळला, महाविद्यालयीन तरुणी जखमी

भरधाव कंटेनरची धडक; अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू

महापालिकेच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे : खोदकाम करताना खांब कोसळला, महाविद्यालयीन तरुणी जखमी -रस्त्याचे खोदकाम करताना खांब कोसळल्याने पादचारी महाविद्यालयीन तरुणी जखमी झाल्याची घटना रविवार पेठेतील देवजीबाबा चौकात घडली. पुरेशी काळजी न घेता खाेदकाम करणाऱ्या महापालिकेच्या ठेकेदाराविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रविवार पेठेत राहणारी महाविद्यालयीन तरुणी जखमी झाली आहे. तिने फरासखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले.

जीवनात प्रेम, आनंद, मौन हीच खरी संपत्ती – सरश्री – सविस्तर बातमी 

तक्रारदार तरुणी एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. रविवार पेठेतील देवजीबाबा चौकात रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. तेथील एका लोखंडी खांबावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरुणी गुरुवारी (१० जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास देवजीबाबा चौकातून निघाली होती. खोदकाम सुरू असताना अचानक खांब तिच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर तिने रात्री उशिरा पोलिसांकडे तक्रार दिली. खोदकाम सुरू असताना ठेकेदाराने पुरेशी काळजी घेणे गरजेचे होते. खांब दोरीने बांधण्याची गरज होती. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे तिला दुखापत झाली. याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रसिद्ध कॅफेत बनमस्कात काचेचा तुकडा

डेक्कन जिमखाना भागातील प्रसिद्ध कॅफेतील बन मस्कात काचेचे तुकडे आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने सोशल मीडियावर चित्रफीत प्रसारित केली आहे. काचेचे तुकडे आढळून आल्यानंतर आकाश जलगी यांनी अन्न आणि ओैषध प्रशसन विभागाकडे तक्रार दिली आहे. आकाश आणि त्यंची पत्नी डेक्कन जिमखाना भागातील प्रसिद्ध इराणी कॅफेत आले होते. त्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या बन मस्कात काचेचे तुकडे होते. आकाश यांना सुरुवातील बनमस्कात बर्फाचे तुकडे चुकून आल्याचे वाटले. त्यांनी बनमस्का नीट पाहिला. तेव्हा त्यात काचेचे तुकडे आढळून आले. त्यांनी कॅफेतील वेटर आणि मालकांना जाब विचारला. तेव्हा मालकांनी त्यांची माफी मागितली. त्यांच्याकडून बील घेतले नाही, असे प्रसारित करण्यात आलेल्या चित्रफितीत आकाश यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली नाही, असे डेक्कन पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×