Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

marathinews24.com

मुंबई – माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५) यांचे शनिवारी (दि.१२) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन – सविस्तर बातमी

देशमुख हे गेल्या १५ वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या संयमित आणि प्रभावी कामकाजामुळे त्यांनी प्रशासन व प्रसार माध्यमांमध्ये दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.

पत्रकारितेतील कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मुंबई दिनांक आणि दैनिक सकाळ या माध्यम समूहातून केली होती. माध्यमांतील अनुभवामुळेच त्यांच्या शासकीय जनसंपर्क कार्यात व्यावसायिकता आणि सुसूत्रता होती.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. सोमवार दि १४ रोजी सकाळी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×