Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर (वय ६४ वर्ष) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे.

पर्यावरणपूरक शाश्वत विकास आणि आपत्ती रोधक बांधकामे काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

सुनीलराव खेडकर यांनी पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर प्रचार प्रमुख, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह, मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख या व अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. शीख संप्रदायचा त्यांचा विशेष अभ्यास होता.

ते मूळचे मुंबईचे होते पण मागील ३० वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. ते अभियंता होते. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. विविध संस्थांचे सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. उत्तम व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते.

अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे त्यांनी आयोजित केली होती. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी भाग संघचालक अनिल व्यास, विनायकराव डंबीर, एमईएसचे माजी अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×