Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याच्या बंगल्यात दरोडा

ज्येष्ठाला धक्का देऊन सोनसाखळी हिसकाविली

८३ तोळे सोन्याचे दागिने, रोकड लुटून चोरटे पसार

marathinews24.com

पुणे – हवाई दलातून निवृत्त झालेल्या निवृत्त अधिकाऱ्याच्या बंगल्यात चोरट्यांनी दरोडा घातल्याची घटना वानवडी परिसरात घडली आहे. अधिकारी, तसेच त्यांच्या पत्नीला धमकावून चोरट्यांनी सोन्याचे हिरेजडीत ८३ तोळे दागिने, साडेसात लाख रुपये असा ५९ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. ८७ वर्षीय अधिकाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात नव्याने ५ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अधिकारी हवाई दलात विंग कमांडर होते. १९९२ मध्ये ते हवाई दलातून निवृत्त झाले. वानवडी गावात त्यांचा कौशल्या बंगला आहे. पत्नी, मुलगा, सून बंगल्यात राहायला आहेत. अधिकाऱ्याच्या मुलाचा वानवडी भागात मोटार,जीप सजावटीचा (कार डेकाॅर) व्यवसाय आहे. बंगल्यातील तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर दोन शयनगृह आहे. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते रात्री अकराच्या सुमारास शयनगृहात झोपायला गेले. त्यांना वयोमानानुसार ऐकू कमी येते. त्यामुळे ते कर्णबधीरासाठी असलेले यंत्र वापरतात. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरटे बंगल्यात शिरले.

चोरटे शिरल्याने आवाज झाला. निवृत्त अधिकारी झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांनी कानाला यंत्र लावले. त्यावेळी दोन चोरटे शयनगृहात शिरले. अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला धमकावून चोरट्यांनी कपाटाची चावी मागितली. दोघांचे मोबाइल चोरट्यांनी हिसकावून घेतले. आरडओरडा केल्यास जिवे मारु, अशी धमकी चोरट्यंनी त्यांना दिली.

चोरट्यांनी कपाट उघडले. कपाटातील दागिने, रोकड असा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला. त्यानंतर चोरटे अंधारात पसार झाले. या घटनेनंतर त्यांनी पहिल्या मजल्यावर झोपेत असलेल्या मुलाग आणि सुनेला जागे करुन या घटनेची महिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.

सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटे कैद

निवृत्त हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरलेले दोन चोरटे सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाले आहेत. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. – डाॅ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×