Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

लाच प्रकरणात मंडल अधिकाऱ्यासह दोघांना ‘एसीबी’ने पकडले

लाच प्रकरणात मंडल अधिकाऱ्यासह दोघांना ‘एसीबी’ने पकडले

मावळातील जमीन प्रकरणात मदतीसाठी २ लाखांची लाच

marathinews24.com

पुणे – लाच प्रकरणात मंडल अधिकाऱ्यासह दोघांना ‘एसीबी’ने पकडले – मावळ तालुक्यातील ३८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी मंडल अधिकाऱ्याला २ लाख रुपयांची, तसेच मध्यस्थाला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. याप्रकरणी मंडल अधिकारी मारूती महादेव चोरमले (वय ५३), तसेच मध्यस्थ जयेश बाळासाहेब बारमुख (वय ३३) यांच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलमांनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’चे विश्र्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून श्रद्धांजली – सविस्तर बातमी 

शिवणे विभागाचे मारूती चोरमले हे मंडल अधिकारी आहेत. जयेश बारमुख मध्यस्थ आहे. तक्रारदाराच्या बहिणीने आणि त्यांच्यासोबत अन्य २१ जणांनी एका बांधकाम व्यावसायिकाला १ कोटी ९० लाख रुपये दिले होते. बांधकाम व्यावसायिकासोबत मावळ कुसगाव येथील गट क्रमांक २०९ मधील ३८ गुंठे क्षेत्र विकसन करारनामा केला होता. २०१८ आणि २०१९ मध्ये संबंधित व्यवहार झाला होता. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने त्यांची फसवणूक केली. संबंधित जमीन त्याने दुसऱ्या व्यक्तीला खरेदीखत करून विक्री केली.

जमीन खरेदी करणाऱ्या एकाने तलाठ्याकडे सातबाऱ्यावर नोंद होण्यासाठी अर्ज केला होता. तलाठ्याने त्याचा फेरफार नोंदवून देखील घेतला तसेच, तो मंजुरीसाठी मारूती चोरमले यांच्याकडे पाठविला होता. ही बाब तक्रारदारांनी समजली. त्यानंतर तक्रारदारासह २१ जणांनी त्यायवर हरकत घेतली. त्यानंतर चोरमले यांनी हरकतीवर सुनावणी घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, तक्रारदार यांची बहीण, तसेच अन्य २१ जणांनी अधिकारपत्र देऊन तक्रारदार यांना या जमिनीचे कुलमुख्यातरपत्र लिहून दिले. त्यानुसार तक्रारदार सुनावणीला उपस्थित राहू लागले.

नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी आणि ३९ गुंठे वादग्रस्त क्षेत्र तक्रारदार यांची बहीण, तसेच २१ जणांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी चोरमले यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. पुढील कामासाठी मध्यस्थ जयेश बारमुख याच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानूसार तक्रारदार त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने चोरमले यांच्यासाठी दोन लाख आणि मध्यस्थीसाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी ‘एसीबी’कडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी (१५ जुलै) सापळा लावून तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच घेताना चोरमले यांना पकडले. बारमुखने ऑनलाइन पद्धतीने १० हजार रुपये स्विकारल्याचे उघड झाले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×