Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

लोकमान्य टिळकांचे पणतू, डॉ. दीपक टिळक यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून श्रद्धांजली

लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांचे निधन

शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे एक व्यक्तिमत्त्व गमावले – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

marathinews24.com

पुणे – टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिपक टिळक यांच्या निधनाने आपण शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे एक व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांचे निधन – सविस्तर बातमी    

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे प्रयत्न डॉ. दिपक टिळक यांनी सातत्याने केले. लोकमान्यांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ या वृत्तपत्र समूहाचे विश्वस्त म्हणून त्यांनी वृत्तपत्राची परंपरा जपत राष्ट्रभक्तीच्या विचारांची मांडणी केली. सामाजिक मूल्यांचा संदेश त्यांनी पत्रकारितेमार्फत दिला.

टिळक कुटुंबीयांचा सामाजिक वारसा पुढे नेताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला नवा आयाम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. दिपक टिळक यांच्या संकल्पनेतून घडले. अनेक विद्यापीठांत होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचा अनुभव घेता आला. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, ही मोठीच हानी. डॉ. दिपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×