पिंपरी महापालिकेत नोकरीच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – सुनेला पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठाची १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुभाष महाजन (वय ६५, रा. फुरसुंगी, सासवड-हडपसर रस्ता), अभिजीत महाजन (वय ३१, रा. मिरज, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, गुंडाविरुद्ध आणखी एक गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महाज यांच्याशी २०२३ मध्ये ज्येष्ठ नागरिकाची एका परिचितामार्फत ओळख झाली होती. महाजन यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या सुनेला पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाकडून आरोपींनी वेळोवेळी १४ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर नोकरी न लावल्याने त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

दुचाकीचा वेग कमी करण्यास सांगितल्याने अल्पवयीनाला बेदम मारहाण – भवानी पेठेतील घटना

पुणे – दुचाकीचा वेग कमी करण्यास सांगितल्याने अल्पवयीनाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जयेश उत्तम कांबळे, सुमीत सुनील बडेकर (वय २३), हर्ष सवाणे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीनाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवययीन भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत राहायला आहे. तो १८ जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास उपाहारगृहातून जेवण आणण्यासाठी निघाला होता. त्यावेळी चाळीत राहणारा आरोपी जयेश भरधाव वेगात दुचाकीवरुन निघाला होता. अल्पवयीनाने त्याला दुचाकीचा वेग कमी करुन हळू चालविण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी अल्पवयीनाचा मित्र तेथे आला. आरोपी जयेश, सुमीत, हर्ष यांनी अल्पवयीन आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ केली. अल्पवयीनाच्या चेहऱ्यावर लोखंडी फायटर मारला. अल्पवयीनाबरोबर असलेल्या दोन मित्रांना आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांना दगड फेकून मारला. पोलीस उपनिरीक्षक कुल्लाळ तपास करत आहेत.

बाणेरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना बाणेर परिसरात घडली. ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला बाणेर भागात राहायला आहेत. त्या १६ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकाविले.

महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाणेर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×